पुण्यात पाकिस्तानी युवकाच्या अटकेनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये बांग्लादेशी नागरिकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 15:49 IST2023-03-15T15:47:11+5:302023-03-15T15:49:25+5:30
ही कारवाई मंगळवारी जुनी सांगवी येथे पोलिसांनी केली...

पुण्यात पाकिस्तानी युवकाच्या अटकेनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये बांग्लादेशी नागरिकाला अटक
- रोशन मोरे
पिंपरी : पासपोर्ट, व्हिसाची वैधता संपलेली असताना देखील सांगवी परिसरात वास्तव करत असलेल्या बांग्लादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.१४) जुनी सांगवी येथे सांगवी पोलिसांनी केली. या प्रकरणी परकीय नोंदणी विभाग विभागातील पोलीस शिपाई प्रफुल्ल संतोषराव शेंंडे (वय ३९) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कालीपाडा विनोदचंद्र सरकार (वय ३५, रा. जुनी सांगवी, मुळ रा. बांग्लादेश) याला अटक केली. यापूर्वी पुण्यातील भवानी पेठेत पुणे पोलिसांनी पाकिस्तानी युवकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कालीपाडा सरकार याच्या पासपोर्ट, व्हिजाची मुदत संपूनही तो सांगवी परिसरात वास्तव करत होता. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. पोलिसांना त्याच्याकडे मतदान कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्डचे झेरॉक्स मिळून आल्या. त्या त्याने अवैधरित्य प्राप्त केल्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.