नामसाधर्म्याचा फायदा घेत बँकेची फसवणूक; मृत खातेदाराच्या पत्नीमुळे प्रकरण उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:47 PM2023-05-23T12:47:06+5:302023-05-23T12:50:02+5:30

ही घटना १८ नोव्हेंबर २०२१ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत भोसरी येथे घडली....

Bank fraud by taking advantage of nomenclature; The case came to light because of the deceased account holder's wife | नामसाधर्म्याचा फायदा घेत बँकेची फसवणूक; मृत खातेदाराच्या पत्नीमुळे प्रकरण उघडकीस

नामसाधर्म्याचा फायदा घेत बँकेची फसवणूक; मृत खातेदाराच्या पत्नीमुळे प्रकरण उघडकीस

googlenewsNext

पिंपरी : मृत व्यक्तीच्या बँक खात्यावरून आपणच ती व्यक्ती असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र तसेच कागदपत्रे देऊन चार लाख रुपयांची एफडी काढून घेतली. मृताची पत्नी बँकेत पैसे काढण्यासाठी आली तेव्हा तिच्या पतीने पैसे काढून नेल्याचे तिला समजले. मात्र, आपल्या पतीचा मृत्यू झाल्याने आपण पैसे काढण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बँकेची फसवणूक झाल्याचे उघड झाले. ही घटना १८ नोव्हेंबर २०२१ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत भोसरी येथे घडली.

या प्रकरणी राहुल चंद्रकांत नाईक (वय ५५, रा.वारजे नाका) यांनी रविवारी (दि.२१) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रमाशंकर बाबूराम विश्वकर्मा (रा. दिघी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांना खोटी कागदपत्रे सादर करून तसेच खोटे प्रतिज्ञापत्र (हानिरक्षण बंधपत्र) देवून नाव साधर्म्य असलेल्या बँकेच्या दुसऱ्या मयत रमाशंकर जे. विश्वकर्मा यांच्या नावावर असलेली मुदत ठेव व रिकरिंग खात्यावरून चार लाख ३१ हजार ७७१ फसवणुकीने काढून घेतले. आरोपीने आपल्याकडील ठेवीच्या पावत्या हरवल्याचे त्याच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. हे पैसे काढल्यानंतर मूळ खातेदार रमाशंकर जे. विश्वकर्मा यांच्या पत्नी बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या तेव्हा बँकेतून पैसे आधीच कोणीतरी काढल्याचे त्यांना समजले.

Web Title: Bank fraud by taking advantage of nomenclature; The case came to light because of the deceased account holder's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.