शहर जोडणा-या मार्गाला अडथळा, केवळ ७०० मीटर रस्त्याचे रखडले भूसंपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:53 AM2017-09-22T00:53:26+5:302017-09-22T00:53:33+5:30

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून थेट मोशी येथे पुणे-नाशिक रोडला जाण्यासाठी रस्ते बांधणीचे काम हाती घेण्यात आले. या आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे ऐंशी टक्के काम पूर्णही झाले आहे.

Barrier to connecting the city, only 700 meters of roadside land acquisition | शहर जोडणा-या मार्गाला अडथळा, केवळ ७०० मीटर रस्त्याचे रखडले भूसंपादन

शहर जोडणा-या मार्गाला अडथळा, केवळ ७०० मीटर रस्त्याचे रखडले भूसंपादन

googlenewsNext

पिंपरी : निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून थेट मोशी येथे पुणे-नाशिक रोडला जाण्यासाठी रस्ते बांधणीचे काम हाती घेण्यात आले. या आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे ऐंशी टक्के काम पूर्णही झाले आहे. मात्र, केवळ सातशे मीटर लांबीचा रस्ता भूसंपादनामुळे होऊ न शकल्याने संपूर्ण रस्ताच लटकला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. शहराच्या एका टोकापासून दुसºया टोकापर्यंत जाण्यासाठी हे रस्ते फायदेशीर ठरत आहे. विविध ठिकाणी प्रशस्त रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्णत्वास गेल्यास वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, काही रस्त्यांची कामे विविध कारणांनी रखडले असून संपूर्ण रस्त्याचा खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. निगडी परिसरातून थेट पुणे-नाशिक मार्गाला जाण्यासाठी निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून ते मोशीत पुणे-नाशिक महामार्गापर्यंत रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्याचे कामही पूर्ण झाले़ मात्र, त्रिवेणीनगर येथे सातशे मीटर अंतरासाठीचे भूसंपादन रखडल्याने हा रस्ता अपूर्णावस्थेत आहे. हा आठ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णत्वास गेल्यास मोठी अडचण दूर होणार आहे. मात्र, सातशे मीटरचा रस्ता भूसंपादनात अडकला आहे.
या त्रिवेणीनगर चौकात मोठ्याप्रमाणात वाहतूक असते. तळवडे येथे आयटी पार्क असून आयटी पार्ककडे निगडी परिसरातूनच मोठ्याप्रमाणात वाहने जात असतात. यासह तळवडे एमआयडीसी परिसरासह देहू तीर्थक्षेत्र असल्याने या परिसरात जाणाºया वाहनांची संख्याही अधिक आहे. ही सर्व वाहने त्रिवेणीनगर चौकातूनच जात असतात. त्यामुळे हा चौक वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे.
या चौकात मोठे खड्डे आहेत. यामुळे वाहने आदळण्यासह खडी रस्त्यावर येत असल्याने वाहने घसरण्याचेही प्रकार अनेकदा घडत असतात. वारंवार मागणी करूनही चौकातील खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते.
>भूसंपादनामुळे त्रिवेणीनगर चौकातील काही भागाचे काम थांबले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामास सुरुवातहोईल. - प्रशांत शिंपी, नगररचनाकार
>भक्ती-शक्ती चौक ते पुणे-नाशिक मार्गापर्यंत हा रस्ता करण्यात आला आहे. केवळ त्रिवेणीनगर चौक परिसरात सातशे मीटर अंतरापर्यंत भूसंपादनाअभावी रस्त्याचे काम राहिले आहे. भूसंपादन झाल्यास उर्वरित काम पूर्ण केले जाईल.
- सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता

Web Title: Barrier to connecting the city, only 700 meters of roadside land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.