बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी

By admin | Published: May 1, 2017 02:31 AM2017-05-01T02:31:11+5:302017-05-01T02:31:11+5:30

महात्मा बसवेश्वर यांचे कार्य व विचार सर्व जनमाणसांपर्यंत पोहोचविले गेले पाहिजे, असे मत गुरुवर्य प्रभूदेवा

Basaveshwar's work inspirational | बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी

बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी

Next

पिंपरी : महात्मा बसवेश्वर यांचे कार्य व विचार सर्व जनमाणसांपर्यंत पोहोचविले गेले पाहिजे, असे मत गुरुवर्य प्रभूदेवा शिवाचार्यमहाराज यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मोरया सोसायटी, कोयनानगर, चिखली येथे आयोजित कार्यक्रमात महापालिकेच्या वतीने राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचे शिष्य गुरुवर्य प्रभूदेवा शिवाचार्यमहाराज यांना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसदस्या अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे, नगरसदस्य संजय नेवाळे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, वीरशैव युवा संघटनेचे प्रा. मनोहर धोंडे, शैलेश जतापुरे, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत शेटे आदी उपस्थित होते.
प्रा. मनोहर धोंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. उमाकांत शेटे यांनी प्रास्ताविक केले. रमेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार किशोर केदारी यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Basaveshwar's work inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.