मूलभूत सोई-सुविधांपासून रहिवासी वंचितच

By Admin | Published: June 13, 2016 02:07 AM2016-06-13T02:07:07+5:302016-06-13T02:07:07+5:30

राजीव गांधीनगर झोपडपट्टी व वैदू वस्तीतील रहिवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

Basic amenities include resident residents | मूलभूत सोई-सुविधांपासून रहिवासी वंचितच

मूलभूत सोई-सुविधांपासून रहिवासी वंचितच

googlenewsNext


पिंपळे गुरव : टीचभर पोटाच्या खळग्यासाठी, पोरा-बाळांच्या भविष्यासाठी काबाडकष्ट करूनही कुटुंबासाठी अठरा विश्वे दरिद्रीच असल्याची परिस्थिती वैदू वस्ती, प्रभाग क्र-५६ मधील प्रभागाची आहे. आजही राजीव गांधीनगर झोपडपट्टी व वैदू वस्तीतील रहिवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. यामध्ये क्रीडांगण, उद्यान, स्मशानभूमी आदी विकासकामे रखडलेली आहेत.
या प्रभागामध्ये वैदूवस्ती, गजानननगर, राजीव गांधीनगर झोपडपट्टी, नेताजीनगर, रामनगर, सूर्यनगरी, सद्गुरुनगर, आनंदनगर, भैरवनाथनगर, सुदर्शननगर, जवळकरनगर, प्रभातनगर, भगतसिंग चौक, गुलमोहोर कॉलनी, काशीद पार्क आदी भागांमध्ये मजूरवर्ग, नोकरवर्ग व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या प्रभागाची लोकसंख्या ३० हजार आहे. या वस्तीत ४० टक्के वैदू समाज आहे. त्यामुळे सुसज्ज रस्ते, उद्यान, पाणीटंचाई, भाजी मंडई, डीपी रस्त्याचे रुंदीकरण, क्रीडांगणे, स्मशानभूमी आदी सुविधा नाहीत. त्यामुळे दैनंदिन जीवन जगणे जिकिरीचे बनले आहे. सकाळी आठला मिळेल, त्या कामासाठी पायपीट करणे हा नित्याचाच खेळ बनला आहे.
या परिसरात मजूरवर्गाचे प्रमाण जास्त असल्यामुळे व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुख्य चौकांमध्ये हातगाड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या वैदूवस्तीमध्ये कचराकुंडीची सोय नसल्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. पालिकेच्या दोन एकर जागेमध्ये उद्यानाचे दोन वर्षांपूर्वी उद्घाटन होऊनही आजतागायत उद्यानाचे काम सुरू झालेले नाही. या उद्यानाच्या जागेत घर दुरुस्तीचा राडारोडा, नाल्यातील कचरा आदींचे ढीग टाकलेले आहेत. क्रीडांगणाच्या जागेमध्ये खासगी वाहने उभी
केलेली असतात. (वार्ताहर)
मशिदीसमोरील रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावले. ड्रेनेज लाइन, नेताजीनगर, गांगर्डेनगर, गजानननगर आदी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन, वैदूवस्तीतील नागरिकांना शौचालयासाठी अनुदान मिळवून दिले. परिसरातील भूमिगत वीजवाहिनीचे काम पूर्ण केले आहे. आरक्षण क्र. ३५६, वैदू वस्ती शाळेची दुरुस्ती व संरक्षण भिंतीचे काम केले. बीआरटीसाठी जागाबाधितांना घरकुल यादीत समावेशासाठी पाठपुरावा केला. हॉकर्स झोनमधील भाजीविके्रत्यांना परवाना मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. क्रीडा सभापती असताना शहरातील खेळाडूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. - रामदास बोकड, माजी क्रीडा सभापती

Web Title: Basic amenities include resident residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.