चिंचवडमध्ये दिग्गजांच्या वर्चस्वाची लढाई

By admin | Published: January 31, 2017 09:15 PM2017-01-31T21:15:54+5:302017-01-31T21:15:54+5:30

चिंचवडमध्ये दिग्गजांच्या वर्चस्वाची लढाई

The battle for the domination of veterans in Chinchwad | चिंचवडमध्ये दिग्गजांच्या वर्चस्वाची लढाई

चिंचवडमध्ये दिग्गजांच्या वर्चस्वाची लढाई

Next

 

 

पिंपरी : महापालिका निवडणुक राजकीय पक्षांसाठी महत्वाची वाटत असताना याच निवडणुकीत काही दिग्गजांचे भविष्यही ठरणार आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. यंदाच्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे या निवडणुकीकडे मिनी विधानसभा या नजरेतूनच पाहिले जात असल्याने या निवडणुकीची रंगत वाढणार आहे. 

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदार संघात सर्वच पक्षांत वर्चस्वाची लढाई असणार आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर भाजपाची तर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहूल कलाटे यांच्यावर शिवसेनेची जबाबदारी आहे. तर राष्टÑवादीतून अनेक नगरसेवक बाहेर पडत असताना अजित पवार यांनी काँग्रेसमधील माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह आठ नगरसेवक काँग्रेसमध्ये घेतले आहेत. तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे हेही यांच्यावरही जबाबदारी आहे. तसेच महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे गटनेते अनंत कोºहाळेंना शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे  जगताप, बारणे व भोईर, साठे, काºहाळे, कलाटे अशा सर्वच नेत्यांची वर्चस्वाची लढाई असणार आहे.  

 

Web Title: The battle for the domination of veterans in Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.