By admin | Published: February 8, 2017 11:19 PM2017-02-08T23:19:59+5:302017-02-08T23:19:59+5:30
बिनविरोध श्रेयाची लढाई
Next
महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी भोसरीतील धावडेवस्ती प्रभागात भाजपाचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतने रवी लांडगे हे रिंगणात असल्याने शिवसेना आणि राष्टÑवादी, मनसेने उमेदवारी दिली नाही. तर अपक्ष म्हणून सुलोचना बढे आणि योगेश लांडगे यांनी अर्ज भरले होते. सुलोचना बढे यांनी सोमवारी माघार घेतली. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी योगेश यांची समजूत काढल्याने माघार घेतली, अशी चर्चा आहे. तर रवी लांडगे यांची निवड होताच माजी आमदार विलास लांडे हे रवी लांडगे यांना शुभेच्छा देत आहेत, केक कापतानाचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले. भाजपाचे माजी शहराध्यक्ष अकुंश लांडगे यांचे माजी आमदार विलास लांडे, शिवसेना गटप्रमुख सुलभा उबाळे अशा सर्वपक्षीयांशी जिव्हाळ्यांचे संबंध होते. त्यामुळे लांडगे यांचे पुतणे म्हणून त्यांना संधी मिळण्यासाठी अन्य पक्षांनी उमेदवार दिले नसल्याची चर्चा आहे. श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.
राष्टÑवादीच्या श्रेयाविषयी आमदार लक्ष्मण जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘उद्या महापालिकेत सत्ता आली तर ती राष्टÑवादीमुळेच आली, असे म्हटले तर आश्चर्य वाटू नये. भोसरीत एक भाजपाचा उमेदवार बिनविरोध होणे यातून महापालिकेत भाजपाची सत्ता येण्याचे द्योतक आहे.’’
महापालिकेच्या गेल्या तीन निवडणूकींपासून एकतरी नगरसेवक बिनविरोध येण्याची पंरपरा कायम आहे. महापालिकेच्या चिंचवड मधून आझम पानसरे, त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार जावेद शेख बिनविरोध निवडून आले होते.
तर २०१२ मध्ये चिंचवड विधानसभेतील पिंपळेगुरव परिसरातून राष्ट्रवादीच्या शकुंतला धराडे आणि रामदास बोकड हे बिनविरोध निवडून आले होते. आता २०१७च्या निवडणुकीत भोसरीतून रवी लांडगे बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे पिंपरी महापालिका निवडणुकीतील बिनविरोधची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. रवी लांडगे यांचे दिवंगत वडील लक्ष्मण लांडगे भाजपचे नगरसेवक आणि महापालिकेची विरोधी पक्षनेते होते. तसेच भाजपा शहराध्यक्ष अकुंश लांडगे यांचे ते पुतणे होत.