१२५ डेसिबलपेक्षा जास्तीचा फटाका विकाल तर खबरदार! अग्निशमन विभागाची परवानगी गरजेची
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 09:35 AM2023-10-09T09:35:03+5:302023-10-09T09:35:29+5:30
फटाक्यांची विक्री करायची असेल तर अग्निशमन विभागाची परवानगी...
पिंपरी : दिवाळीमध्ये फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांचे प्रदूषण मानव व पशूंच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक असते. त्यामुळे प्रदूषण महामंडळाने फटाक्यांच्या आवाजावर निर्बंध घातले आहे.
निवासी भागात, मोकळ्या मैदानात व दवाखाने आणि शाळा, महाविद्यालय असलेल्या परिसरात फटाके फोडताना किती डेसिबल आवाज असावा, याबाबतही नियम आहे. त्यामुळे फटाक्यांची विक्री करताना विक्रेत्याने १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके विकू नये, अन्यथा विक्रेत्यावर कारवाई होऊ शकते. तसेच १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडणाऱ्यांवरही प्रदूषण महामंडळ गुन्हे दाखल करू शकते.
फटाक्यांची विक्री करायची असेल तर अग्निशमन विभागाची परवानगी
फटाक्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्याला १५ दिवसांसाठी ४५० किलोग्रॅमपर्यंत फटाका विक्री करताना अग्निसुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असते. त्यासंदर्भात १७ प्रकारच्या सूचना विभागाने केल्या आहेत. या सूचनांचे पालन न केल्यास दुकानाचा परवाना रद्द करण्यासंदर्भात विभागातर्फे पोलिसांना शिफारस करू शकतात.
अग्निशमन विभागाची परवानगी
- दिवसा : निवासी भागात ६० डेसिबलपेक्षा नको. रस्त्यावर मोकळ्या मैदानात ८० डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको.
- रात्री : निवासी भागात ५५ डेसिबल. रस्त्यावर मोकळ्या मैदानात ७० डेसिबल.
- दवाखान्याच्या परिसरात ५५ डेसिबलपेक्षाही कमी आवाज असावा.
काय कागदपत्रे लागणार?
- मागील वर्षाची फटाका दुकानाचे परवान्याची झेराॅक्स प्रत
- चालू वर्षाची मनपाची टॅक्स पावती
- भाडेतत्त्वावरील दुकान असेल तर भाडे पावती व घरमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
- आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचे संमतीपत्र
- १०० रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र
- साइड मॅप
- निरीक्षण शुल्क १,००० रुपये
- पर्यावरण शुल्क तीन हजार रुपये