लोणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या : पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 04:38 PM2019-11-03T16:38:29+5:302019-11-03T16:39:10+5:30

रामजन्मभूमिच्या वादावर 9 नाेव्हेंबरला निर्णय येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमिवर लाेणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण हाेणार नाही याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पाेलीस निरीक्षकांनी केले.

Be careful not to cause religious rift in Lonavla city | लोणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या : पाटील

लोणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या : पाटील

Next

लोणावळा : राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्ष, 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिद व श्रीराम जन्मभूमी यावर होणारा निर्णय तसेच 10 नोव्हेंबर रोजी होणारी ईद ए मिलाफ ची मिरवणुक या कोणत्याही घटनेमुळे लोणावळा शहरात धार्मिक तसेच जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता समाजातील प्रत्येक घटकांने घ्यावी असे आवाहन लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी आज पार पडलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत केले.  

पाटील म्हणाले 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिद व श्रीराम जन्मभूमी याबाबतचा निर्णय होणार आहे. जो काही निर्णय लागेल तो न्यायालयीन निर्णय असून सर्वांवर बंधनकारक असणार आहे. या निर्णयाचे स्वागत अथवा त्याविरोधात कोणीही प्रतिक्रिया देऊन आपल्या शहरातील वातावरण खराब करु नये. काही समाजकंटक मंडळी या घटनांचा फायदा घेत समाजात दुफळी माजविण्याचा प्रयत्न करतात. अशा मंडळींना जागीच आळा घालण्याकरिता प्रत्येकाने जागृती राहणे गरजेचे आहे. लोणावळा शहर पर्यटनस्थळ असल्याने याठिकाणी घडणार्‍या घटनांचा परिणाम दुरगामीपणे या शहराच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. लोणावळा शहरात पुर्वीपासून सर्व जाती धर्माची लोकं सर्वधर्म समभावाने एकत्र राहतात, सर्व सण उत्सव साजरे करतात. असेच खेळीमेळीचे वातावरण शहरात राहणे अपेक्षित आहे. 

शहराबाहेरुन कोणी तरी येऊन येथिल शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याला तात्काळ रोखायला हवे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कोणत्याही राजकिय पक्षाचा किंवा संघटनेचा निर्णय नसून तो घटनेच्या आधारावर सर्व साक्षी पुरावे याचा अभ्यास करुन विधीगत निर्णय आहे. याचा कोणीही फायदा घेण्याची आवश्यकता नाही. निर्णय कोणताही असला तरी तो कायदेशिरपणे स्विकारणे बंधनकारक असल्याने त्यांचा परिणाम येथे होता कामा नये, अशा घटनांमध्ये दाखल झालेले गुन्हे हे आपल्या मुलांचे आयुष्य खराब करु शकतात याकरिता पालकांनी मुलांना सक्त ताकिद द्यावी अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. उपस्थित शांतत‍ कमिटी सदस्यांनी देखिल याकाळात पोलीसांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत मते व्यक्त केली.

Web Title: Be careful not to cause religious rift in Lonavla city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.