दांडियात दांडी लागल्याने तिघांकडून मारहाण; अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी
By नारायण बडगुजर | Updated: October 23, 2023 14:29 IST2023-10-23T14:28:38+5:302023-10-23T14:29:03+5:30
सिमेंटच्या ब्लॉकने अल्पवयीन मुलाच्या डोक्यात, कानावर, गालावर मारून गंभीर जखमी केले

दांडियात दांडी लागल्याने तिघांकडून मारहाण; अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी
पिंपरी : दांडिया खेळताना चुकून दांडी लागल्याच्या कारणावरून तीन जणांनी अल्पवयीन मुलाला मारहाण केली. यात मुलगा गंभीर जखमी झाला. चिखलीतील जाधववाडी येथे ओंकारनगर चौकात शनिवारी (दि. २१) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली.
आदित्य उर्फ डापक्या, विशाल पवळे, गणेश कोठावळे (सर्व रा. ओंकारनगर, जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अल्पवयीन मुलाने याप्रकरणी रविवारी (दि. २२) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा ओंकारनगर चौकात दांडिया खेळत असताना त्यांच्या तोंडओळखीची मुले संशयिताना चुकून दांडी लागली. त्या कारणावरून त्यांनी शिवीगाळ करत अल्पवयीन मुलाच्या तोंडावर, डोळ्यावर हाताने मारहाण केली. गणेश याने सिमेंटच्या ब्लॉकने अल्पवयीन मुलाच्या डोक्यात, कानावर, गालावर मारून गंभीर जखमी केले. ‘जर तू आमच्या नादाला लागला तर तुला मारून टाकू’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.