प्लास्टिक कॅरी बॅग मागणाऱ्या ग्राहकाला बांबूचे फटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:46 PM2018-06-30T18:46:00+5:302018-06-30T18:47:35+5:30
कॅरी बॅग मागितल्यामुळे एका बेकरी दुकानदाराच्या रागाचा पारा इतका चढला की ग्राहकाला त्याने बेदाम मारहाणच केली.
पिंपरी :ग्राहकाने प्लास्टिक कॅरीबॅग मागितली, म्हणून बेकरी दुकानदाराने त्यास बांबूचे फटके दिले. नेहरूनगर येथे घडलेल्या याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनवेल झेवियर दास (वय-३४ रा.मासूळकर वसाहत) या ग्राहकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बेकरी दुकानदार नसरुद्दीन अन्सारी (वय-२७ रा.नेहरू नगर) याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही दिवसांपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू झाला आहे. प्लास्टिक वापरावर दंड आकारण्यात येणार त्याचा भुर्दंड व्यावसायिकांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे कॅरी बॅगची मागणी करणाऱ्या ग्राहकाचा राग आल्याने बेकरी चालकाने त्यास मारहाण केली. पिंपरी नेहरूनगर येथील एका बेकरी दुकानदाराच्या रागाचा पारा इतका चढला की प्लास्टिक पिशवी मागणाऱ्या ग्राहकाला त्याने बेदम मारहाणच केली. ग्राहकाने प्लास्टिक कॅरीबॅगची मागणी केल्याने आधी दुकानदार आणि ग्राहक यांच्यात वादावादी झाली, त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. बेकरी दुकानदाराने ग्राहकाला बांबूचे फटके दिले.