चोरी करताना पाहिले म्हणून बेदम मारहाण, तलवारीने वार; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

By रोशन मोरे | Published: September 6, 2023 04:06 PM2023-09-06T16:06:05+5:302023-09-06T16:07:24+5:30

ही घटना रविवारी (दि.२३) रात्री पावनेबाराच्या सुमारास पिंपरी येथे घडली...

beaten, stabbed with a sword for being seen stealing; Opposing crimes filed | चोरी करताना पाहिले म्हणून बेदम मारहाण, तलवारीने वार; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

चोरी करताना पाहिले म्हणून बेदम मारहाण, तलवारीने वार; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

googlenewsNext

पिंपरी : चोरी करताना पाहिले म्हणून सुरक्षारक्षकाला तलवारीने तसेच हाताने मारण्यात आले. ही घटना रविवारी (दि.२३) रात्री पावनेबाराच्या सुमारास पिंपरी येथे घडली. या प्रकरणी सुखदेव राजेंद्र मोरे (वय ४५, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी संशयित उज्वल विनोद लव्हे (२१) याला अटक केली असून गौरव वाल्मिकी (२५), राज वाल्मिकी (१८, तिघे रा.पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, उज्वल विनोद लव्हे यांनी सुखदेव मोरे आणि त्यांच्या मुलगा कुमार मोरे यांच्या विरोधात विरोधात मारहाण केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित उज्वल, गौरव हे स्टील चोरी करत असताना फिर्यादी सुखदेव मोरे यांनी पाहिले. ते दोन भावांमधील भांडण सोडवण्यासाठी गेले होते. तेथे संशयित उज्वल आला. तो सुखदेव मोरे यांच्याकडे खुन्नस देऊन पाहत असताना ते त्याला म्हणाले की मी तुला आणि गौरवला चोरी करताना पाहिले आहे. त्यावेळी उज्वल याने शिविगाळ केली तसेच गौरव तेथे तलवार घेऊन आला. त्या तलवारीने सुखदेव यांच्या हातावर मारण्यात आली.

तसेच संशयित राज याने देखील सुखदेव यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तर, उज्वल विनोद लव्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुखदेव मोरे यांनी तु माझे नाव का घेतले, असे म्हणत उज्ज्वल यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा कुमार याने देखील लोखंडी हातोडा उज्वल यांना मारुन जखमी केले.

Web Title: beaten, stabbed with a sword for being seen stealing; Opposing crimes filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.