पाणीकपात मागे

By admin | Published: June 13, 2017 04:17 AM2017-06-13T04:17:10+5:302017-06-13T04:17:10+5:30

पावसाळा सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील दिवसाआड पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. शहरात मंगळवारपासून नियमित पाणी पुरवठा करण्यात

Behind the waterfall | पाणीकपात मागे

पाणीकपात मागे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील दिवसाआड पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. शहरात मंगळवारपासून नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.
शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने महाराष्ट्र दिनानंतर दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला होता. पवना धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणी कपातीसाठी आग्रही असणाऱ्या महापौरांना विरोधकांनी लक्ष्य केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाणीकपातीला विरोध केला होता. टँकर लॉबीसाठी पाणीकपात केली जात आहे, असा आरोप केला होता. पाऊस लांबणीवर पडल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून पाणीकपात केल्याचे महापौरांनी सांगितले होते. पाऊस सुरू झाल्यास कपात मागे घेऊ,असेही जाहीर केले होते.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. याबाबत महापालिकेत सोमवारी बैठक घेण्यात आली. या वेळी सभागृहनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे,
विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल
कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत आदी उपस्थित होते.
एकनाथ पवार म्हणाले, ‘‘एक महिन्यापूर्वी पाणीकपात केली होती. महिनाभरामध्ये चार टक्के पाणी वाचले आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये. यासाठी पाणीकपात करणे गरजेची आहे. त्यामुळे दहा टक्के पाणीकपात कायम ठेवण्यात येणार आहे. मंगळवारपासून शहरवासीयांना दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.’’

पवना धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एक महिन्यापूर्वी म्हणजेच २ मेपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. पावसाला सुरुवात झाली आहे. धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. परंतु, पावसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी केवळ १० टक्के पाणीकपात कायम ठेवून मंगळवापासून नियमित एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.- नितीन काळजे, महापौर

Web Title: Behind the waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.