गुजरातचे आहोत म्हणून त्याच भागाला प्राधान्य देणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 03:11 PM2023-01-08T15:11:16+5:302023-01-08T15:30:22+5:30

नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान मुलासारखे असले पाहिजे

Being from Gujarat does not suit Prime Minister Narendra Modi to give priority to the same area - Raj Thackeray | गुजरातचे आहोत म्हणून त्याच भागाला प्राधान्य देणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही - राज ठाकरे

गुजरातचे आहोत म्हणून त्याच भागाला प्राधान्य देणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही - राज ठाकरे

googlenewsNext

पिंपरी : महाराष्ट्र राज्य सर्वार्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे  एखाद-दुसरा उद्योग बाहेर गेल्याने फार नुकसान होणार नाही. हा दर्या मे खसखस असा हा प्रकार आहे, आपण गुजरातचे आहोत म्हणून त्याच भागाला प्राधान्य देणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही. राज्यकर्ता मोठ्या मनाचा असावा. तो कधीच व्यापारी नसावा. व्यापारी त्याच्या हाताखाली असावा, असे मत परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी व्यक्त रविवारी पिंपरीत केले.

पिंपरी-चिंचवड शहरात जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या वतीने शोध मराठी मनाचा या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात ठाकरे बोलत होते. त्यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ व्यंगयत्रिकार प्रभाकर वाईरकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी घेतली. त्यात ठाकरे यांनी व्यंगचित्रकला, तिचे भवितव्य, मुस्कटदाबी, सध्याचे राजकारण, बेरोजगारी यावर परखड मते मांडली. स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आणि यशराज पाटील यांनी ठाकरे यांचा सत्कार केला.  

प्रत्येक राज्य हे समान मुलासारखे असले पाहिजे

राज्यघटनेने संघ राज्याची चौकट तयार केली आहे. देशातील एकाच विशिष्ट राज्याला प्राधान्य देणे हे चुकीचे नाही का?, यावर ठाकरे म्हणाले, ‘‘हे मी आधीच बोललो आहे. तेव्हा सर्वांचा शहामृग झाला होता. सगळ्यांनी माना आत घातल्या होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य हे त्यांच्यासाठी समान मुलासारखे असले पाहिजे. आपण स्वत:  गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणे, हे एका पंतप्रधानाला शोभत नाही. मनमोहन सिंग पंजाबचे म्हणून सर्व पंजबला, उद्या तमिळ पंतप्रधान होईल म्हणून सर्व तमिळनाडूला देईल, ही कुठची पद्धत आहे.’’

Web Title: Being from Gujarat does not suit Prime Minister Narendra Modi to give priority to the same area - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.