‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा; 'संस्कार जत्रा २०१८'चे चिंचवडमध्ये उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 04:41 PM2018-01-08T16:41:41+5:302018-01-08T16:44:10+5:30

संस्कार जत्रा २०१८चे उद्घाटन पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. चिंचवड मधील बिजलीनगर येथे विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ पटांगणात या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

'Beti Bachao, Beti Padhao' slogan; 'Sanskar Jatra 2018' inaugurated in Pimpari Chinchwad | ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा; 'संस्कार जत्रा २०१८'चे चिंचवडमध्ये उद्घाटन

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा; 'संस्कार जत्रा २०१८'चे चिंचवडमध्ये उद्घाटन

Next
ठळक मुद्देपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना करण्यात आले सन्मानित

चिंचवड : संस्कार जत्रा २०१८चे उद्घाटन पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. चिंचवड मधील बिजलीनगर येथे विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ पटांगणात या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी परिसरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत 'बेटी बचाओ, बेटी पाढाओ' या जनजागृती अभियानाचा नारा दिला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मोहन गायकवाड, हभप मंगला कांबळे, प्रशासन अधिकारी बजरंग आवारी, ब प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, प्रभाग अधिकारी दिपक आमडेकर, टाटा मोटर्सचे एन. एस. दिवेकर, कामगार कल्याण मंडळाचे प्रमुख प्रदीप बोरसे, सामाजिक कार्यकर्त्या निता परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. आकुर्डीतील प्राथमिक विद्यालयाचे विकास गायकवाड यांना संस्काररत्न, डॉ. सुधाकर पेटकर यांना योगरत्न, रामदास जंगम यांना समाजरत्न, जिल्हा परिषद शाळेचे प्रकाश घोडके यांना 'कला रत्न', सरस्वती विद्यालय आकुर्डीच्या विद्या भालेराव यांना संस्काररत्न व अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी समृद्धी यादव हिला 'कलारत्न' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्लोगन स्पर्धेत अस्मिता गुरव प्रथम क्रमांक, विकास गायकवाड यांना द्वितीय, सुखदेव आमले यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. सुनीता तिकोने व ज्योती तापकीर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. बेटी बचाओ अभियानात न्यू इंग्लिश स्कूल (बिजलीनगर), गुड शेफर्ड स्कूल (बिजलीनगर), श्री गोदावरी विद्यालय (चिंचवड) व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्यालय (आकुर्डी) यांनी सहभाग घेतला. 
प्रकाश शेंडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Web Title: 'Beti Bachao, Beti Padhao' slogan; 'Sanskar Jatra 2018' inaugurated in Pimpari Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.