पिंपरी चिंचवडकरांनो,सावधान; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; कडक निर्बंध लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 06:34 PM2021-03-22T18:34:32+5:302021-03-22T18:35:03+5:30

नियम तोडणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई : आयुक्त

Beware, Pimpri Chinchwadkar citizen ; The administration took a big decision; Strict restrictions apply | पिंपरी चिंचवडकरांनो,सावधान; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; कडक निर्बंध लागू

पिंपरी चिंचवडकरांनो,सावधान; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; कडक निर्बंध लागू

googlenewsNext

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. रविवारी १४०० रुग्ण आढळले आहेत. ही वाढ दोन आठवड्यांपासून आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. आयुक्तांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी बैठक घेऊन निर्बंध कडक केले आहेत. मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी आठ भरारी पथके नियुक्त केले आहेत. तसेच रुग्णसंख्येनुसार रुग्णसंख्येनुसार ऑरेंज, पिवळा आणि लाल झोन तयार केले आहेत. नियम तोडणाऱ्यांवर फौजदारी दाखल करणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. रविवारी १४०० रुग्ण आढळले आहेत. ही वाढ दोन आठवड्यांपासून आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. आयुक्तांनी नियमावली जाहीर केली आहे.

शहरात आता तीन झोन

शहरात रुग्णवाढ संख्येनुसार तीन झोन तयार केले आहेत. गृहनिर्माण सोसायटी, वस्ती, कॉलनी तीन विभागांत वर्गीकरण करण्यात येणार आहे. एलो, ऑरेंज आणि रेड झोनची निर्मिती केली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय हद्दीत एक याप्रमाणे आठ अंमलबजावणी पथके नियुक्त केली आहेत.

असे आहेत झोन...
१) पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येनुसार वर्गीकरण केले असून, एकूण लोकसंख्येच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी रुग्णसंख्या आढळलेल्या भागास पिवळा भाग म्हटले आहे.

२) एकूण लोकसंख्येच्या पाच ते वीस टक्के रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास ऑरेंज झोन म्हटले आहे.

३) शहराच्या एकूण लोकसंख्येच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास लाल (रेड झोन) म्हटले आहे.

दुकाने सील करणार
शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनामास्क वावरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, सॅनिटायझरचा सुविधा न करणे याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आठ भरारी पथके नेमली आहेत. भाजी मंडई, बाजारपेठ, मजूर अड्डे यांसह इतर गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या नियमांचे उल्लंघन यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच दुकाने सील करण्यासाठी स्वतंत्र आठ पथके नेमण्यात आली आहेत. यात दोन पोलिसांचा समावेश असणार आहे.
शहर पातळीवर गस्त वाढविणार

महापालिकेच्या वतीने आठ क्षेत्रीय कार्यालयांत वॉर रूम, हेल्पलाइन कार्यान्वित केली जाणार आहे. आकाशचिन्ह परवाना विभागामार्फत जनजागृती फलक लावण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्ती वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. रिक्षा, टेम्पोद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

-राजेश पाटील, आयुक्त

Web Title: Beware, Pimpri Chinchwadkar citizen ; The administration took a big decision; Strict restrictions apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.