भाटकरांच्या आठवणींनी हळवा झाला स्वर अन् उलगडला मैत्रीचा पदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:13 AM2019-02-06T01:13:47+5:302019-02-06T01:14:21+5:30

प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते.

Bhatkar's memories have melancholy | भाटकरांच्या आठवणींनी हळवा झाला स्वर अन् उलगडला मैत्रीचा पदर

भाटकरांच्या आठवणींनी हळवा झाला स्वर अन् उलगडला मैत्रीचा पदर

Next

पिंपरी : प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते. नोकरी करीत त्यांनी अभिनयाची आवड जोपासली आणि त्यातून एक सकस अभिनेता घडला. भाटकरांच्या अकाली जाण्याने टाटा मोटर्समधील सहकाऱ्यांचा स्वर काहीसा हळवा झाला होता.

पिंपरी-चिंचवड शहरातील टाटा मोटर्स कंपनी म्हणजे शाऩ त्यामधून मोठे झालेले मान्यवर आज कला, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांत नावलौकिक कमवित आहेत. त्यापैकी एक म्हणजेच रमेश भाटकर होत. त्यांच्या हृद्य आठवणी त्यांचे सहकारी मित्र बाबा राणे यांनी सांगितल्या. मित्राची आठवण सांगताना त्यांना सद्गदीत झाले होते.

बाबा राणे हेही कलावंत. नोकरी सांभाळून त्यांनी कलेची आवड जोपासली होती. राणे म्हणाले, ‘‘टाटा मोटर्स कंपनीत असताना बॅच नंबर ५ मध्ये प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून रमेश भाटकर रूजू झाले. १९७९ ते वर्ष होते. १९८० ते ८५ या कालखंडात भाटकर यांनी नोकरी केली. कंपनीतील पहिल्या दिवसापासूनच आमची ओळख झाली. म्हणतात ना मैत्रीला ओळख लागत नाही. ओळख मैत्रीत बदलली. आणि तो माझा खूप चांगला मित्र झाला. रमेश हा अत्यंत उत्साही होता. व्हर्सटाईल अ‍ॅक्टर होता. कलेबाबत त्याचे समर्पण होते. नाटक त्याचा आणि माझा श्वास. आम्ही विविध नाटकांत एकत्रितपणे काम करू लागलो. ग्रँड मास्टर, एकात्मका एकांकिका आणि अनेक नाटकात एकत्र काम केले. त्या वेळी ते पुण्यात राजेंद्रनगर येथे राहायचे. त्यानंतर कोथरूडला राहायला गेले. काम करून आम्ही नाटकाचे प्रयोग करायचो. आवड जोपासायचो. पुढे नाटक क्षेत्रात व्यावसायिक नाटके वाढायला लागली. कंपनीचे काम आणि नाटक असा काही मेळ बसेना. म्हणून १९८५ मध्ये त्याने कंपनी सोडली. त्यानंतर आमचा संवाद तुटला होता. मध्यंतरी त्यास पुरस्कार मिळाला आणि आजाराबद्दल समजले त्या वेळी मी भेटायला गेलो. त्या वेळी नाटकांचा तो सुवर्णकाळ समोर आला. आम्ही केलेल्या नाटकांचे त्यांनी काही डायलॉग बोलून दाखविले. त्याची स्वत:ची एक अनोखी शैली आहे. पाठांतरही उत्तम. उत्तम कलावंत आणि उत्तम माणूस म्हणूनही त्याची ओळख होती. चित्रपटातील नायक अचानकपणे सोडून गेल्याने पोकळी निर्माण झाली आहे.’’

Web Title: Bhatkar's memories have melancholy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.