पिंपरी-चिंचवड: समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याने केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 18:22 IST2021-11-26T18:19:03+5:302021-11-26T18:22:41+5:30
पिंपरी: समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी एकाने नकार दिला. त्यामुळे त्याला मारहाण केल्याची घटना भोसरी एमआय़ीसी येथे घडली आहे. बुधवारी (दि. ...

पिंपरी-चिंचवड: समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याने केली मारहाण
पिंपरी: समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी एकाने नकार दिला. त्यामुळे त्याला मारहाण केल्याची घटना भोसरी एमआय़ीसी येथे घडली आहे. बुधवारी (दि. २४ ) रात्री पावणे नऊच्या दरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश राजेंद्र भुते (वय २४, रा. महेशनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला समलैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यासाठी फिर्यादीने विरोध केला. त्या कारणावरून आरोपीने कठीण वस्तूने मारहाण केली. त्यात फिर्यादीच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. तसेच डोक्याला व छातीला मुक्कामार लागला आहे. मारहाण केल्यानंतर आरोपीने फिर्यादीकडील १८०० रुपये रोख आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.