भोसरी पोलीस, गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम, घेण्यात आला २५० बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 11:57 PM2021-03-10T23:57:41+5:302021-03-10T23:58:59+5:30

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भरत वाघ, शिवाजी जव्हेरी यांनी वाहनमालकांचा शोध घेतला. 

Bhosari Police, Gangamata Vehicle Search Organization, conducted a search for the owners of 250 unattended vehicles | भोसरी पोलीस, गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम, घेण्यात आला २५० बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध 

भोसरी पोलीस, गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम, घेण्यात आला २५० बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध 

Next

 
पिंपरी : विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या मात्र अनेक वर्षांपासून पडून असलेल्या २५० बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाणे व गंगामाता वाहन शोध संस्था यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. (Bhosari Police, Gangamata Vehicle Search Organization, conducted a search for the owners of 250 unattended vehicles)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भरत वाघ, शिवाजी जव्हेरी यांनी वाहनमालकांचा शोध घेतला. 

शंकर आवताडे म्हणाले, विविध गुन्ह्यात शेकडो वाहने जप्त केली जातात. न्यायालयीन प्रक्रिया तसेच मूळ मालकांचा नाव व पत्ता माहित नसल्याने शेकडो वाहने पडून असतात. भोसरी पोलीस ठाण्याकडील अशा एक हजाराहून जास्त असलेल्या वाहनांपैकी २५० वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांना त्यांची वाहने परत दिली जाणार आहेत. गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहनमालकांना संपर्क साधण्यात येणार आहे. संबंधित वाहनमालकांनी भोसरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून वाहन घेऊन जावे. १५ दिवसांत वाहन घेऊन न गेल्यास ती वाहने बेवारस समजून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.

Web Title: Bhosari Police, Gangamata Vehicle Search Organization, conducted a search for the owners of 250 unattended vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.