भोसरीतील ट्रान्सफॉर्मर स्फोटाची चौकशी सुरू; मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 06:19 PM2020-09-06T18:19:01+5:302020-09-06T18:19:17+5:30

एजन्सीला कारणे दाखवा नोटीस; महावितरणचे स्पष्टीकरण

Bhosari transformer blast probe underway 4 lakh assistance to the families of the deceased | भोसरीतील ट्रान्सफॉर्मर स्फोटाची चौकशी सुरू; मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत

भोसरीतील ट्रान्सफॉर्मर स्फोटाची चौकशी सुरू; मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत

googlenewsNext

भोसरी: भोसरी येथील इंद्रायणीनगरमध्ये विद्युत रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मर) स्फोटप्रकरणी राज्य शासनाच्या जिल्हा विद्युत निरीक्षकांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या निरीक्षण अहवालाप्रमाणे महावितरणचे दोषी अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधीत रोहित्र पुरवठादार एजन्सीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिन्ही मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

भोसरी येथील इंद्रायणीनगरमध्ये राजवाडा बिल्डींग 2 जवळ विद्युत रोहित्राचा शनिवारी (दि. 4) दुपारी दीड वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत शारदा दिलीप कोतवाल, हर्षदा सचिन काकडे व त्यांची 5 महिन्यांची मुलगी यांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना महावितरणकडून प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षकांकडून या विद्युत रोहित्राच्या स्फोटाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशी अहवालानुसार महावितरणच्या संबंधीत दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच महावितरणकडूनदेखील तीन सदस्यीय समिती या स्फोटाची अंतर्गत चौकशी करत आहे. तसेच महावितरणकडून संबंधित अधिकाऱ्यांना स्फोटप्रकरणी तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. स्फोट झालेले विद्युत रोहित्र काही तासांपूर्वीच बसविण्यात आले होते. हे रोहित्र पुरवठा करणाऱ्या एजंसीला देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: Bhosari transformer blast probe underway 4 lakh assistance to the families of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.