पिंपरी: मोरवाडी येथे मोठी आग; तीन कंपन्यांमधील लाखोंचे साहित्य खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 10:53 AM2022-06-01T10:53:29+5:302022-06-01T11:13:33+5:30
आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी :आग लागून तीन कंपन्यांमधील लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. मोरवाडी, पिंपरी येथे मंगळवारी (दि. ३१) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
नॅश्लीप टेक्नोरिअल, राया एन्टरप्रायजेस आणि श्री ओम इलेक्ट्रिकल या कंपन्यांमधील साहित्य आगीत खाक झाले. आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाला माहिती दिली. त्यानंतर लागलीच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्यातासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
राया एन्टरप्रायजेस या कंपनीत प्लास्टिक कॅरेटच्या साफसफाईचे काम केले जाते. आगीत प्लास्टिक कॅरेट सह इतर साहित्य जळून खाक झाले. तसेच इतर दोन कंपन्यांमधील इलेक्ट्रिकल व इतर साहित्य आणि कागदपत्रे जळाली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.