चिखलीमध्ये दुचाकी व कारचा अपघात; दुचाकी जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 09:10 IST2023-12-14T09:10:22+5:302023-12-14T09:10:29+5:30
अपघातामध्ये एक जण किरकोळ जखमी

चिखलीमध्ये दुचाकी व कारचा अपघात; दुचाकी जळून खाक
चिखली : चिखली येथील कृष्णानगर भाजी मंडई चौकात रात्री पावणेबराला सुमारास दुचाकी व चारचाकी यांची धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीला आग लागून दुचाकी जागेवर जळून राख झाली.
अपघात ग्रस्त वाहनांमध्ये कार (क्रमांक एम एच १४ एल बी ३८२१) असून दुचाकी जळाल्याने क्रमांक समजू शकला नाही. अपघातामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला असल्याचे प्रत्यक्ष दर्शिकडून सांगण्यात आले.चिखली पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र केदार व नारायण तांबे यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. नंतर अग्निशामक बंब येवून आग विझवली गेली व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.