Pimpri Chinchwad: डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; जुनी सांगवीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 12:09 IST2023-07-21T12:08:46+5:302023-07-21T12:09:53+5:30
जुनी सांगवी येथे बुधवारी (दि. १९) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली...

Pimpri Chinchwad: डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; जुनी सांगवीतील घटना
पिंपरी : कचऱ्याच्या डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जुनी सांगवी येथे बुधवारी (दि. १९) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
संकेत गणेशराव वानखडे (वय २४, रा. शिवाजीनगर, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. डॉ. अक्षय भीमराव वानखडे यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डंपरचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा चुलत भाऊ संकेत हे जुनी सांगवी येथून त्यांच्या दुचाकीवरून जात होते. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास राजीव गांधी ब्रिज चेक पोस्टजवळ कचऱ्याच्या डंपरने संकेत यांच्या दुचाकीला धडक दिली. यात संकेत यांचा मृत्यू झाला.