दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी
By नारायण बडगुजर | Published: February 29, 2024 03:41 PM2024-02-29T15:41:31+5:302024-02-29T15:42:30+5:30
भरधाव दुचाकी चालवल्याने दुचाकीची बीआरटीच्या दुभाजकाला धडक बसली
पिंपरी : भरधाव दुचाकी बीआरटीमार्गावरील दुभाजकाला धडकली. त्यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात १० फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वापाचच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे कोकणे चौकाकडून पीके चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला.
संकेत राम माने (वय २५, रा. साई चौक, रा. रहाटणी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश भोंडवे (३५) हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत आणि आकाश हे दोघेजण दुचाकीवरून कोकणे चौकाकडून पी. के. चौकाकडे जात होते. संकेत हा दुचाकी चालवत होता. भरधाव दुचाकी चालवल्याने दुचाकीची बीआरटीच्या दुभाजकाला धडक बसली. या अपघातात संकेत याचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीवर पाठीमागे बसलेला आकाश गंभीर जखमी झाला.