आयटी पार्कमध्ये अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, हिंजवडी फेज २ मधील घटना
By नारायण बडगुजर | Published: October 14, 2023 06:16 PM2023-10-14T18:16:24+5:302023-10-14T18:17:39+5:30
आयटीपार्क हिंजवडी फेज २ येथे शुक्रवारी (दि. १३) दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला....
पिंपरी : भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला खाली पडली. यात तिच्या डोक्यावरून ट्रकचे मागचे चाक केल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. आयटीपार्क हिंजवडी फेज २ येथे शुक्रवारी (दि. १३) दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
ज्योती जोयल चोंडीकर (३७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे भाऊ निरज दीपक लखन (३१, रा. कैलासनगर, लेन २, थेरगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात ट्रकचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निरज लखन यांची बहीण ज्योती चोंडील या शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हिंजवडी फेज २ येथून दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी अज्ञात ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव चालवून ज्योती यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ज्योती जमिनीवर पडल्या. त्यावेळी ट्रकचे मागचे चाक ज्योती यांच्या डोक्यावरून गेले. यात गंभीर दुखापत होऊन ज्योती यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक कोणतीही वैद्यकीय मदत न देता पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.