माैजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरल्या तब्बल १० लाखांच्या दुचाकी; पोलिसांनी जप्त केली १९ वाहनं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:16 PM2021-08-30T20:16:33+5:302021-08-30T20:18:20+5:30

चोरी केलेल्या १० लाख ३५ हजार रुपये किमतीच्या १९ दुचाकी त्यांच्याकडून पोलिसांनी जप्त केल्या.

Bikes stolen by minors for fun; Hinjewadi police seized 19 vehicles | माैजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरल्या तब्बल १० लाखांच्या दुचाकी; पोलिसांनी जप्त केली १९ वाहनं

माैजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरल्या तब्बल १० लाखांच्या दुचाकी; पोलिसांनी जप्त केली १९ वाहनं

Next

पिंपरी : मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तसेच एकाला अटक केली. या कारवाईमुळे १४ गुन्ह्यांची उकल झाली असून त्यांनी चोरी केलेल्या १० लाख ३५ हजार रुपये किमतीच्या १९ दुचाकी त्यांच्याकडून पोलिसांनी जप्त केल्या. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुलांनी शिंदेवस्ती मांरुजी येथून एक दुचाकी चोरी केली आहे. ते गाडी घेऊन शिवाजी चौक हिंजवडी येथे येणार आहेत, अशी माहिती पोलीस अंमलदार अतिक शेख व श्रीकांत चव्हाण यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांनी हिजवडी, वाकड, तळेगाव दाभाडे येथे दुचाकी चोरी केल्याचे पोलीस चौकशीत कबूल केले. यातील एक अल्पवयीन मुलावर खुनाचा गुन्हा दाखल आहे.

दुसऱ्या कारवाईमध्ये गोविंद शंकर धाड (वय २५, रा. वाकड. मूळ रा. यवतमाळ) याला अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी हस्तगत केली. तिन्ही चोरट्यांकडून १० लाख ३५ हजार रुपये किमतीच्या १९ दुचाकी हिंजवडी पोलिसांनी जप्त केल्या. हिंजवडी, वाकड, तळेगाव दाभाडे आणि डेक्कन पोलीस ठाण्यातील १४ गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले. अन्य पाच दुचाकीच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. 

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सांवत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, सुनील दहिफळे, तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक सागर काटे, उपनिरीक्षक समाधान कदम, सहाय्यक उपनिरिक्षक महेश वायबसे, बंडू मारणे, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, कुणाल शिंदे, अतिक शेख, रितेश कोळी, शिवराम भोपे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, झनकसिंग गुमलाडु, सुभाष गुरव, नुतन कोंडे, रेखा धोत्रे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Bikes stolen by minors for fun; Hinjewadi police seized 19 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.