महापालिकेकडून सहलीवर कोट्यवधींची उधळपट्टी, कोथरूडमधील संस्थेला एक कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:53 AM2019-03-20T01:53:16+5:302019-03-20T01:53:35+5:30

अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या सहलीनंतर आता विद्यार्थ्यांच्या सहलींवरही कोट्यवधीचा खर्च केला जाणार आहे.

 A bill of crores of rupees on the trip from NMC, one crore in Kothrud Society | महापालिकेकडून सहलीवर कोट्यवधींची उधळपट्टी, कोथरूडमधील संस्थेला एक कोटी

महापालिकेकडून सहलीवर कोट्यवधींची उधळपट्टी, कोथरूडमधील संस्थेला एक कोटी

Next

पिंपरी : अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या सहलीनंतर आता विद्यार्थ्यांच्या सहलींवरही कोट्यवधीचा खर्च केला जाणार आहे. महापालिकेच्या
वतीने विकसित केलेल्या पर्यावरण संस्कार आणि आयुर्वेदिक वनौषधी उद्यानांमध्ये महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन केले जाणार आहे.
सहलीचे आयोजन करणाऱ्या कोथरूडमधील संस्थेवर एक कोटी रुपये खर्च होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान, वृक्षसंवर्धन विभागामार्फ त विविध प्रकारची १७८ उद्याने विकसित केलेली आहेत. त्यामध्ये पर्यावरणविषयक बाबींचा समावेश असलेले पर्यावरण संस्कार उद्यान व आयुर्वेदिक वनौषधी उद्यानही आहे. या उद्यानातील पर्यावरणविषयक बाबींची जनजागृती व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या पाचवी ते नववी आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी कोथरूडमधील निसर्ग जागर प्रतिष्ठान या संस्थेमार्फ त सहलींचे आयोजन केले जाते. आता महापालिका शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना या पर्यावरण संस्कार उद्यान व आयुर्वेदिक वनऔषधी उद्यानांची माहिती दिली जाणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सन २०१९-२० या वर्षात महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निसर्ग जागर प्रतिष्ठानामार्फ त सहलींचे आयोजन केले जाते. त्यासाठी एक कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

बाकडे बसविण्यासाठी ५० लाख
१ महापालिकेच्या शहरातील १७८ उद्यानांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने वेगवेगळ्या आकाराचे फलक लावणार आहे. निसर्गजागर प्रतिष्ठानामार्फ त फलक बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च होणार आहे. शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांच्या सोईसाठी २५० लोखंडी बाकडे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च होणार आहे.
२उद्यानात बसविण्यात येणारी बाकडे कस्टमाईज्ड फॅब्रिकेटेडचे असणार आहेत. त्यासाठी ठेकेदारांकडून आॅनलाइन निविदा मागविण्यात आले. पुन:प्रत्ययी आदेशानुसार, कमी दराने म्हणजेच ४९ लाख ६१ हजार रुपये दराने निविदा सादर केलेल्या रेखा इंजिनिअरिंग वर्क्स या ठेकेदाराला कामाचा आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही मान्यता दिली. त्यानुसार, करारनामा करण्यासाठी मान्यता देण्यास स्थायी समितीनेही मंजुरी देण्यात आली.
 

Web Title:  A bill of crores of rupees on the trip from NMC, one crore in Kothrud Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.