द्विलक्ष्यीचे आरक्षित प्रवेशही आॅनलाईन
By admin | Published: April 2, 2017 02:48 AM2017-04-02T02:48:31+5:302017-04-02T02:48:31+5:30
इयत्ता अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रवेशाप्रमाणेच येत्या शैक्षणिक वर्षापासून द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाचे आरक्षित प्रवेशही
पिंपरी : इयत्ता अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रवेशाप्रमाणेच येत्या शैक्षणिक वर्षापासून द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाचे आरक्षित प्रवेशही आॅनलाईन पद्धतीने दिले जाणार आहेत. हे प्रवेशाची प्रक्रिया पहिल्या टप्प्यातच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश समितीमार्फत दिले जातात. त्यासाठी दरवर्षी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. यंदाही हे प्रवेश आॅनलाईन पद्धतीनेच दिले जाणार आहे. मागील वर्षीपर्यंत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे प्रवेश आॅनलाईन प्रक्रियेद्वारे केले जात होते. आता येत्या शैक्षणिक वर्षापासून किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमाचे (एमसीव्हीसी) प्रवेशही आॅनलाईन होणार आहेत. तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमांचे आरक्षित जागांवरील प्रवेशही आॅनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याविषयी माहिती देताना राऊत म्हणाल्या, राज्य शासनाचा दि. २१ आॅगस्ट २०१४ रोजीचा निर्णय आहे. या निर्णयानुसार तांत्रिक विषय घेऊन इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी द्विलक्षी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. ज्या संस्थांमध्ये द्विलक्षीचे प्रवेश होतात. (प्रतिनिधी)