महापालिका सभांना बायोमेट्रिक हजेरी
By admin | Published: April 21, 2017 05:57 AM2017-04-21T05:57:13+5:302017-04-21T05:57:13+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांनाही आता बायोमेट्रिक हजेरी द्यावी लागणार आहे. सर्वसाधारण सभा आणि विषय समित्यांच्या सभांना आल्यानंतर सभेत प्रवेश करताना
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांनाही आता बायोमेट्रिक हजेरी द्यावी लागणार आहे. सर्वसाधारण सभा आणि विषय समित्यांच्या सभांना आल्यानंतर सभेत प्रवेश करताना आणि बाहेर जाताना अशा दोन्हीवेळी नगरसेवकांचे बायोमेट्रिक पद्धतीने थम्ब इंप्रेशन व फेसरीडिंग घेतले जाणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या सर्वसधारण सभेत मंजुरी देण्यात आली. पुढील सभेपासूनच त्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले.
महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सर्वसाधारण सभांना उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची बायोमेट्रिक आणि फेसरीडिंग हजेरी घेण्यात यावी, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांना केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. त्यानुसार सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)