बिऱ्हाड पाठीवर घेऊन कारभारी महापालिकेत

By admin | Published: November 26, 2015 12:49 AM2015-11-26T00:49:44+5:302015-11-26T00:49:44+5:30

महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली, तसे अनेकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून

Birbhad backstage in the municipal corporation | बिऱ्हाड पाठीवर घेऊन कारभारी महापालिकेत

बिऱ्हाड पाठीवर घेऊन कारभारी महापालिकेत

Next

पिंपरी : महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली, तसे अनेकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून, आतापासूनच महापालिका भवनात घिरट्या मारू लागले आहेत. काहीजण तर कुटुंबातील सदस्यांनाही महापालिकेची वारी घडवू लागले आहेत.
केवळ महापालिका असे ऐकत आलो आहे. मात्र, नेमकी महापालिकेची इमारत कशी आहे, महापौर, आयुक्त यांचे कार्यालय कोठे आहेत, विषय समित्यांची कार्यालये कोठे आहेत, यासह महासभेचे कामकाज कसे चालते याबाबत अनेकांना उत्सुकता असते. निवडणूक लढायची म्हटल्यास या गोष्टींची माहिती असायला हवी. यामुळे अनेकजण उत्सुकतेपोटी महापालिका पाहायला येत आहेत. यामध्ये विद्यमान नगरसेवकांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
अद्याप प्रभाग, की वॉर्ड निश्चित व्हायचे आहे. आरक्षण काय असेल याचा अंदाज नाही. असे असताना पत्नीसह मुलाला घेऊन काहीजण महापालिकेत तासन् तास घालवितात. महिलांसाठी आरक्षित वॉर्ड झाला, तर पत्नी, नाही झाला तर मुलगा अथवा स्वत: असे नियोजन केलेले महाशय बिऱ्हाडासह महापालिकेत पडीक असतात.
काळेवाडी परिसरातील एक महिला नगरसेवक पती आणि मुलासह पालिकेत असतात. पती माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत ज्याला संधी मिळेल त्याला निवडणूक लढविता आली पाहिजे या उद्देशाने संपूर्ण कुटुंबच पालिकेत घिरट्या मारीत आहे.
विद्यमान शिक्षण मंडळ सदस्यांनाही नगरसेवकपदाचे वेध लागले आहेत. शिक्षण मंडळापुरते मर्यादित असलेल्या या सदस्यांचा महासभेशी संबंध येत नाही. त्यामुळे त्यांना येथील कामकाजाबाबत उत्कंठा आहे. शिक्षण मंडळाचे सदस्यपद आहे, नगरसेवक होऊ शकतो, असे त्यांना वाटू लागले आहे. शिक्षण मंडळाच्या कामकाजात तत्परता न दाखविणारे सदस्यही महापालिका कामकाजाची माहिती घेताना दिसतात. शुक्रवारी झालेल्या सभेला एक विद्यमान शिक्षण मंडळ सदस्य पत्रकार कक्षात येऊन बसले होते. ‘महासभेबाबत आपल्यालाही थोडे माहिती असावे, त्यामुळे आलोय’ असे म्हणत बसून होते.(प्रतिनिधी)

Web Title: Birbhad backstage in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.