जयंती, पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम :लोकमान्य, लोकशाहिरांचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:02 AM2017-08-04T03:02:06+5:302017-08-04T03:02:06+5:30
लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पिंपरी : लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाषणे, गीत आणि पोवाड्यांमधून त्यांच्या जीवनकार्यांचे स्मरण करण्यात आले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संचालित प्राथमिक विद्यालय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संचालित प्राथमिक विद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती व
लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित झाला. विद्यालयातील नवीन विद्यार्थी व शिक्षक यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना चॉकलेट व फूल देण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थापक दिलीप निंबारकर, अध्यक्षा जयश्री निंबारकर उपस्थित होते.
जयवंत प्राथमिक शाळा
जयवंत महिला शिक्षण आणि उद्योग सोसायटी संचालित जयवंत प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मुख्याध्यापिका वंदना सावंत यांनी प्रतिमांचे पूजन केले. रुपेश घोलप हा लोकमान्य टिळक व विनय गायकवाड हा विद्यार्थी अण्णा भाऊ साठे यांच्या भूमिकेत आला होता. पाचवी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. काहींनी टिळक व अण्णा भाऊ यांच्या जीवनचरित्रावर भाषण केले. वंदना सावंत यांनी टिळकांची गोष्ट आणि लोकशाहिरांचे साहित्य सांगितले. प्रगती कुंभार व महिमा विटे यांनी निवेदन केले. शर्वरी आठल्ये यांनी संयोजन केले.
अनुसाई ओव्हाळ विद्यालय
पुनवळे येथील अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आठवी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी भाषणातून अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. नगरसेविका रेखा दर्शले, नितीन दर्शले, संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद ओव्हाळ, विश्वास ओव्हाळ, मुख्याध्यापक जी. एस. गवळी, डी. एम. नेवाळे, व्ही. के. भिंताडे, वाय. ए. ढावरे, डी.जे. खैरनार, व्ही.एस.गायधने, आर.के. भालेराव आदी उपस्थित होते.
ज्ञानप्रभात विद्यामंदिर
सहयोगनगर येथील ज्ञानप्रभात विद्यामंदिरात जयंती व पुण्यतिथी असा संयुक्त कार्यक्रम झाला. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर भाषणे व गीते सादर केली. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल गवळी, संचालिका सुमन गवळी, मुख्याध्यापक राहुल गवळी, मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे, संजय सोंडेकर, राम जगदाळे, प्रवीण घोरपडे, हेमांगी थानावाला, अंकिता गायकवाड, विजया राजगोपाल, प्रमोद गायकवाड, शिवदास तागतोडे आदी उपस्थित होते.