चिखलीत मधमाशांनी घेतला चावा
By admin | Published: April 26, 2017 03:52 AM2017-04-26T03:52:06+5:302017-04-26T03:52:06+5:30
येथील घरकुल परिसरामध्ये पिसाळलेल्या मधमाशांनी सुमारे दहा ते बारा रहिवाशांना चावा घेतला़ चावा घेतल्यामुळे प्रचंड प्रमाणात वेदना होत
चिखली : येथील घरकुल परिसरामध्ये पिसाळलेल्या मधमाशांनी सुमारे दहा ते बारा रहिवाशांना चावा घेतला़ चावा घेतल्यामुळे प्रचंड प्रमाणात वेदना होत असल्यामुळे सदर रहिवाशांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घरकुल परिसरात बांधकाम पूर्ण झालेल्या; परंतु घरकुलाचे वाटप न झाल्यामुळे रिकाम्या असलेल्या इमारतीला आगीमोहळ आहे़
सोमवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मधमाशांच्या पोळ्यात लाकडी बांबू घालून मधमाशांना डिवचल्यामुळे पिसाळलेल्या मधमाशांनी परिसरातील नागरिकांवर हल्ला केला. यामध्ये आशाबाई हिवाळे, द्रोपदी हिवाळे, संध्या हिवाळे, ओम गोसावी, आदर्श गोसावी, पूजा गोसावी आदींना मधमाशांनी चावा घेतला़
आशाबाई हिवाळे यांना जास्त मधमाशांनी चावा घेतला असल्यामुळे कार्यकर्ते विशाल नेवाळे यांनी त्यांना वायसीएम रुग्णालयात नेले़ उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले. या वेळी घटनस्थळावर नगरसेवक संजय नेवाळे यांनी भेट दिली़ तसेच मधमाशांनी चावा घेतलेल्या नागरिकांची विचारपूस केली. (वार्ताहर)