भाजपा उमेदवारावर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा
By admin | Published: February 23, 2017 03:05 AM2017-02-23T03:05:49+5:302017-02-23T03:05:49+5:30
महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपाचे उमेदवार राजेश पिल्ले
पिंपरी : महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपाचे उमेदवार राजेश पिल्ले यांच्यावर घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नेहरुनगर येथील क्रांती चौकात घडली होती. याप्रकरणी पोलीस नाईक संदीप महादेव मांडवी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उमेदवार राजेश गोविंदस्वामी पिल्ले (वय ५०, रा. अजमेरा, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात घातक हत्यारे बाळगण्यास बंदी घातली असतानाही पोलीस आयुक्तांच्या या आदेशाचे उल्लंघन करून मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नेहरूनगर
येथील राजीव गांधी शाळेजवळ राजेश पिल्ले हे एक लोखंडी तलवार घेऊन आले होते. (प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी मंगळवारी मतदान झाले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास नेहरुनगर येथे प्रभाग क्रमांक नऊमधील भाजपाचे उमेदवार राजेश पिल्ले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली.