भाजपा जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाला घरचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:21 AM2018-08-28T00:21:04+5:302018-08-28T00:21:26+5:30
रामनाथ वारिंगे : विरोधी काम करणाऱ्यांना हाकला
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात आमदार भाजपाचा, लोणावळा, तळेगाव नगरपालिका, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डावर भाजपाची सत्ता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीतही नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या उमेदवाराचा पराभव झाला, तर उपनगराध्यक्षपदासाठी विरोधांकडून कुबडी घेण्याची वेळ आली. विरोधी काम केलेल्यांची पक्षातून हकालपट्टी न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव अटळ आहे, असे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामनाथ वारिंगे यांनी सांगितले.
वारिंगे म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी पक्षविरोधी काम केले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी व पक्षातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी केली होती. परंतु ती न केल्याने त्यांनी नगरपंचायतीत पुन्हा तेच काम केले.त्यामुळे पक्षाची नाचक्की झाली. ग्रामीण भागातील पक्षाचे कार्यकर्ते प्रामाणिक आहेत.त्यामुळे वडगाव शहरातील जिल्हा व तालुकास्तरावर विविध पदे भूषविणाºया नेत्यांनी यापुढे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना उपदेश न करता प्रथम गाव सांभाळावे. ’