महाराष्ट्र संकटात असताना भाजपा राजकारणाची एकही संधी सोडत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 08:49 PM2020-04-13T20:49:45+5:302020-04-13T20:55:28+5:30

मदतीवरती निर्बंध आणण्यासाठी भाजपाकडून जाणीवपूर्वक राजकारण

BJP does not miss a chance of politics when Maharashtra is in crisis | महाराष्ट्र संकटात असताना भाजपा राजकारणाची एकही संधी सोडत नाही...

महाराष्ट्र संकटात असताना भाजपा राजकारणाची एकही संधी सोडत नाही...

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद

पिंपरी : कोरोना विषाणूंच्या प्रादुभार्वामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अशावेळी सरकारी तिजोरीत येणारा पैशांची आवक थांबली आहे. या वेळी अनेक कापोर्रेट कंपन्या सरकारच्या मदतीसाठी धावून आले असताना त्यांच्या मदतीवरती निर्बंध आणण्यासाठी भाजपाकडून जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याची टीका पिंपरी-चिंचवडराष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केली आहे.
  वाघेरे म्हणाले, राज्यात लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद आहेत. अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे व राज्यातील सरकारी तिजोरीत येणाऱ्या पैशांची आवक बंद झाली आहे. त्यावेळी शासनाकडून अनेक लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी या खात्यात देणगी देण्यात अनेक खासगी व कापोर्रेट कंपन्यांनी मोठे योगदान दिले. मात्र, या कापोर्रेट कंपन्यांनी दिलेले योगदान सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) फंड म्हणून गृहीत धरला जाणार नाही, असे परिपत्रक केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने काढले.
  मागील वर्षी महाराष्ट्रात पूरसदृश परिस्थिती असतानाही पश्चिम महाराष्ट्रावरती भाजपाकडून राजकारण केले. त्याची फळे त्यांंनी विधानसभा निवडणुकीत भोगली आहेत. यापूर्वी राज्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता थेट पंतप्रधान मदत निधीस मदत केली. राज्यात भाजपा विरोधी महाविकास आघाडी सरकारला भाजपाकडून कोंडी करण्याचे संधी सोडत नाही. भाजपाकडून सर्वसामान्य नागरिकांशी होणारे कुटिल राजकारण थांबवावे

Web Title: BJP does not miss a chance of politics when Maharashtra is in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.