पिंपरीत स्थायी समिती सभापतीसाठी अर्ज भरताना भाजपाच्या शितल शिंदे यांची बंडखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 07:12 PM2019-03-02T19:12:24+5:302019-03-02T19:43:24+5:30
उमेदवारीवरून भाजपात दोन गट पडले आहेत..
Next
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून विलास मडिगेरी, राष्ट्रवादीकडून मयूर कलाटे आणि भाजपा बंडखोर गटाकडून शितल शिंदे याचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. भाजपर्फे विलास मडिगेरी, बंडखोर गटाकडून शितल शिंदे आणि राष्ट्रवादीकडून मयूर कलाटे या चार जणांचे अर्ज भरले आहेत. उमेदवारीवरून भाजपात दोन गट पडले आहेत.