Pimpri Chinchwad: भाजपचे प्रवक्ते, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचा शिवसेनेत प्रवेश!

By विश्वास मोरे | Published: October 25, 2023 12:40 PM2023-10-25T12:40:31+5:302023-10-25T12:42:32+5:30

स्थानिक नेत्यांच्या राजकारणाचा फटका!....

BJP spokesperson former city president Eknath Pawar joins Shiv Sena! | Pimpri Chinchwad: भाजपचे प्रवक्ते, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचा शिवसेनेत प्रवेश!

Pimpri Chinchwad: भाजपचे प्रवक्ते, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचा शिवसेनेत प्रवेश!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष, पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेते आणि सद्याचे प्रवक्ते एकनाथ पवार यांनी रविवारी भाजपाला रामराम ठोकला होता. पक्षाच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला. आज बुधवारी दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यामध्ये एकनाथ पवार यांचे योगदान मोठे आहे.  टाटा मोटर्स मधील कामगार नेते म्हणून त्यांनी कामगार चळवळीत योगदान दिले. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, पक्षप्रवक्ते अशी विविध पदे भूषविली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. २०१२ मध्ये भाजपा शहराध्यक्ष म्हणून काम केले. त्याचबरोबर २०१४ च्या भोसरी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी पिंपरीमध्ये सभा घेतली होती. मात्र भाजपा, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी लढत झाल्याने अगदी थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

स्थानिक नेत्यांच्या राजकारणाचा फटका!

भोसरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर २०१७च्या महापालिका निवडणूकमध्ये पूर्णनगर, संभाजी नगर प्रभागातून निवडून आले होते. त्यानंतर तीन वर्षे पक्षाचे महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते म्हणून त्यांनी भूमिका बजावली. मात्र, स्थायी समिती सभापती म्हणून त्यांना डावलले गेले. आमदार महेश लांडगे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील स्थानिक राजकारणाचा फटका एकनाथ पवार यांना बसला, असे असतानाही त्यांनी आपल्या प्रभागामध्ये नव्हे तर, शहर परिसरामध्ये पक्षनेता म्हणून काम करत असताना मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली.

दुपारी करणार मातोश्रीवर प्रवेश!

भारतीय जनता पक्षातील निष्ठावान आणि ज्येष्ठ सहकार्यांमधील ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ पवार यांचं योगदान आहे. भाजपातील अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसला. भोसरी विधानसभेमध्ये विद्यमान आमदार महेश लांडगे असल्याने आगामी काळात संधी नसल्याने गेल्या काही वर्षांपासून ते नांदेडमधील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामधून संघटना बांधण्याचे काम करत होते. त्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेची अर्थात उद्धव ठाकरे आणि मतदार आहेत. त्यामुळे एकनाथ पवार हे कोणती राजकीय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता होती. बुधवारी दुपारी वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे.

Web Title: BJP spokesperson former city president Eknath Pawar joins Shiv Sena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.