दुध का दुध पाणी होणार ! लाचखोरी प्रकरणातील सत्य समोर यावं म्हणून भाजपच पाठपुरावा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 08:58 PM2021-08-19T20:58:06+5:302021-08-19T20:58:15+5:30

महापालिका स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयावर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली.

The BJP will follow up to bring out the truth in the bribery case | दुध का दुध पाणी होणार ! लाचखोरी प्रकरणातील सत्य समोर यावं म्हणून भाजपच पाठपुरावा करणार

दुध का दुध पाणी होणार ! लाचखोरी प्रकरणातील सत्य समोर यावं म्हणून भाजपच पाठपुरावा करणार

Next

पिंपरी : महापालिकेचे स्थायी समिती सभापती यांच्यासह ४ कर्मचाऱ्यांवर पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्यांना अटक केली. यामागे खूप मोठा राजकीय हस्तक्षेप आणि षडयंत्र असून, अ‍ॅड. नितीन लांडगे यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असा आरोप भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी गुरुवारी केला. तर ‘‘दुध का दुध पाणी का पाणी होईल, असा दावा आमदार लक्ष्मण जगताप यांनी कोला आहे.

महापालिका स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयावर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. रोकड, कागदपत्रे ताब्यात घेत स्थायी समिती अध्यक्ष अ‍ॅड. लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाºयांची चौकशी केली. पंचनामा, जाबजबाब घेत सभापती आणि चार कर्मचाºयांना अटक केली.
या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि प्रवक्ते अमोल थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘अतिशय खालच्या थराला जाऊन पिंपरी-चिंचवडमध्येराजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अँटी करप्शन विभागाने कारवाई कोणत्या आधारावर केली. हे अजून स्पष्ट झालेले नाही. केवळ तक्रार केली म्हणून कारवाई केली हे अपेक्षित नाही. कोणताही लेखी पुरावा नसताना, एखादे कॉल रेकॉर्ड नसताना कोणत्या आधारावर कारवाई केली. अ‍ॅड. लांडगे अतिशय स्वच्छ आणि समाजसेवेचा वारसा असलेल्या परिवारातील व्यक्तिमत्व आहे ते राजकारणात केवळ आणि केवळ समाजसेवा म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अशी कोणतीही गोष्ट होणे शक्य नाही.
 इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करणे हे अतिशय निंदनीय आहे. चार कर्मचाºयांवर झालेल्या कारवाई बाबत भाजपकडून पाठपुरावा केला जाणार आहे यामधून सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे. छ’
........................
सत्य समोर येईल; हा रचलेला डाव: आमदार जगताप

माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘अ‍ॅड. लांडगे स्वच्छ प्रतिमा आणि घरंदाज व्यक्तिमत्व आहे. त्यांची स्वत:ची इतकी मालमत्ता आहे. कोणताही लोभ मनात ठेवून ते काहीही करणार नाही.भाजप शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. नागरिकांच्या हिताच्या अनेक चांगल्या गोष्टी भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेने उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपाची सत्ता शहरात येणार असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्यामुळे केवळ राजकीय हेतू ठेवून अँटी करप्शनची कारवाई व्हावी या हेतूने संपूर्णपणे हा प्रकार रचण्यात आलेला आहे. मात्र, सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही. सत्य समोर यावे म्हणून प्रशासकीय यंत्रणेला भाजपाकडून संपूर्णपणे सहकार्य केले जाणार आहे यातून दूध का दूध और पानी का पानी होईल.’’

Web Title: The BJP will follow up to bring out the truth in the bribery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.