भाजपाची तीन ग्रामपंचायतींत सरशी, डोंगरगावात शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:03 AM2018-09-28T01:03:00+5:302018-09-28T01:03:31+5:30

मावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली. यात भाजपाने ठाकूरसाई, तुंग व केवरे या तीन ठिकाणी सरपंचपदावर विजय मिळविला.

 BJP win three gram panchayats , the Shiv Sena-rewarded candidate in Dongargaon | भाजपाची तीन ग्रामपंचायतींत सरशी, डोंगरगावात शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी

भाजपाची तीन ग्रामपंचायतींत सरशी, डोंगरगावात शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी

Next

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली. यात भाजपाने ठाकूरसाई, तुंग व केवरे या तीन ठिकाणी सरपंचपदावर विजय मिळविला. शिवसेनेने डोंगरगाव सरपंचपदावर विजय मिळविला. या निकालामुळे भाजपाने मावळातील तीन ग्रामपंचायतींत सरशी केल्याचे दिसून आले.
वडगाव येथील महसूल भवनात सकाळी दहा वाजता नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरवात झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

ठाकूरसाई सरपंचपदी नारायण पांडुरंग बोडके (२३९), प्रभाग क्रमांक १ निर्मला राजेंद्र भोसले (९०), अरविंद नारायण रोकडे (बिनविरोध), प्रभाग २ - रामदास लक्ष्मण खैरे (१०४), रेखा रामदास ठाकर (११०), प्रभाग ३ - कमल ज्ञानदेव मानकर, धर्मेंद्र निवृत्ती ठाकर (दोघेही बिनविरोध), एक जागा रिक्त.
डोंगरगाव - एकूण नऊ जागांपैकी दोन जागा बिनविरोध - सरपंचपदी शिवसेनेचे सुनील बाळकृष्ण येवले (४५६), प्रभाग क्रमांक १ - शुभांगी विश्वास कोळसकर (२९१), जयश्री राजेंद्र दळवी (२६९), प्रदीप गंगाराम घोलप (३००), प्रभाग क्रमांक २ - सतीष श्रीरंग चव्हाण (२२६), अनिता अनंत दळवी (२२६), राजश्री राजेश जोगले (बिनविरोध), प्रभाग क्रमांक ३ - सविता दिनेश जायगुडे (३२०), सुनीता सुभाष खोले (२४४), ज्ञानेश्वर महादू वाघमारे (बिनविरोध),
४तुंग - सरपंचपदी वसंत नथू म्हसकर (४११), सीताबाई दगडू लोहकरे (१०३), शुभांगी संदीप पाठारे (१२१), प्रभाग क्रमांक २ - विलास लक्ष्मण वाघमारे (१४७), शांताराम सतू पाठारे (१५०), शांताबाई नामदेव पांगारे (१३९), प्रभाग ३ - शंकर भागू आखाडे (१४०), उषा राघू ठोंबरे (१४५).
४केवरे- सरपंचपदी नवनाथ बबन कुडले (३१८), प्रभाग क्रमांक १ - रघुनाथ शंकर पवार, कांताताई नारायण पवार (दोन्ही बिनविरोध), प्रभाग २ - भाऊ चिनकू पवार (१३४), सुवर्णा संतोष राऊत, पल्लवी संजय गोणते (बिनविरोध), प्रभाग क्रमांक ३ - सखुबाई भाऊ पवार, भाऊ रोंधू दळवी (बिनविरोध).

Web Title:  BJP win three gram panchayats , the Shiv Sena-rewarded candidate in Dongargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.