राष्ट्रवादीला भाजपाचा दणका
By admin | Published: May 14, 2016 12:23 AM2016-05-14T00:23:54+5:302016-05-14T00:23:54+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे.
चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे. शिक्षण मंडळाचे माजी सभापती सदस्य चेतन घुले, माजी उपसभापती व विद्यमान सदस्य सविता खुळे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, पीसीएमटीचे माजी अध्यक्ष सुरेश चोंधे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरेश तापकीर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
निवडणूक अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपली आहे.भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पक्षबांधणीस सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मोहरे फोडण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पुणे येथे आले होते. त्या वेळी त्या वेळी अनेकांनी प्रवेश केला. त्यात शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, माजी उपसभापती सविता खुळे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, राष्ट्रवादीच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती व काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष बारणे, काँग्रेसच्या नगरसेविका व पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चोंधे, माजी महापौर माई ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरेश तापकीर, काळेवाडी येथील हेमंत तापकीर, राज तापकीर, वाकड येथील राम वाकडकर आणि दिघी येथील कांचन लांघी, रहाटणीतील अनिल नखाते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार जगताप, भाजपा नेते सारंग कामतेकर, एकनाथ पवार, नामदेव ढाके उपस्थित होते. (प्रतिनिधी)