राष्ट्रवादीच्या ‘गाजर डे’वर सत्ताधारी भाजपाची चुप्पी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 05:21 AM2018-02-18T05:21:58+5:302018-02-18T05:22:10+5:30
आरोपांना सडेतोड उत्तरे द्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिकेतील पदाधिकाºयांना आदेश आहेत. तरीही राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने काढलेल्या गाजर मोर्चाला कोणीही उत्तर दिले नाही. भाजपाच्या महापालिकेतील कारभारावर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केले.
पिंपरी : आरोपांना सडेतोड उत्तरे द्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिकेतील पदाधिकाºयांना आदेश आहेत. तरीही राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने काढलेल्या गाजर मोर्चाला कोणीही उत्तर दिले नाही. भाजपाच्या महापालिकेतील कारभारावर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केले. मात्र, गाजर मोर्चावर भाजपाची चुप्पी का, असा प्रश्न भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
भाजपाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात निषेध केला. ‘गाजर डे’ साजरा करून सरकारचा निषेध केला. तरीही भाजपाच्या एकाही पदाधिका-याने त्यांना उत्तर देण्याची तसदी घेतली नाही.
महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गैरकारभाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी झाल्यानंतर पक्षप्रतिमा मलिन होऊ नये, म्हणून आमदार, खासदार, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेते यांच्यासह मुख्य पदाधिकाºयांची बैठक बोलावली होती. त्यात पक्षांतर्गत कुरघोडी करणाºयांची कानउघडणी केली होती. पक्षांतर्गत बातम्या माध्यमांकडे जातातच कशा? याबाबतही नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी आरोपांचे खंडण पदाधिकाºयांनी केले होते. त्या वेळी विरोधक चुकीच्या पद्धतीने आरोप करीत असतील तर त्यांना सडेतोड उत्तर द्यायला हवे. नागरिकांत गैरसमज पसरविला जात असेल तर याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी, अशा सूचनाही केल्या होत्या.