भाजपाचा स्वबळाचा नारा

By admin | Published: April 27, 2017 05:02 AM2017-04-27T05:02:47+5:302017-04-27T05:02:47+5:30

भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पिंपरीत झाली. त्यास निवडक ६८ सदस्य उपस्थित होते. या वेळी भाजपाला

BJP's Swabal slogan | भाजपाचा स्वबळाचा नारा

भाजपाचा स्वबळाचा नारा

Next

पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पिंपरीत झाली. त्यास निवडक ६८ सदस्य उपस्थित होते. या वेळी भाजपाला मिळालेले अभूतपूर्व यश, शेतकरी आत्महत्या, शिवसेनेची टीका, मध्यावधी निवडणूक, सरकारची धोरणे यावर चर्चा झाली. मध्यावधी निवडणूक लागल्यास स्वबळाची तयारी ठेवा, कामाला लागा, अशाही सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
पिंपरीतील पंचतारांकित हॉटेलात सकाळी भाजपातील निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह निवडक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. या वेळी महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकींमधील यशाबद्दल चर्चा झाली. या वेळी भाजपाच्या ध्येयधोरणावर चर्चा, तसेच पुढील कामकाजाचे नियोजन यावर चर्चा झाली. राज्यातील शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास मध्यावधी निवडणूक लागल्यास भूमिका काय असेल? यावर चर्चा झाली.
सत्तेत असूनही शिवसेना भाजपावर टीका करते. त्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे. याबाबत आक्रमक भूमिका घ्यायला हवी. विरोधकांना अंगावर येऊ देऊ नका? त्या वेळी काहींनी देशात आणि राज्यात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे स्वबळाची तयारी करावी. स्वबळावर निवडणूक लढवावी, अशीही चर्चा झाली. त्यावर पक्षातील ज्येष्ठांशी चर्चा केली जाईल. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करू, मध्यावधी निवडणूक लागल्यास आपण तयारीत रहायला हवे, असेही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांना सांगितले. सरकारच्या चांगल्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा? अशाही सूचना करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट गावागावांतील शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन चर्चा केली पाहिजे. प्रश्न जाणून घ्यायला हवेत. सरकारची शेतीविषयक धोरणे कशी चांगली आहेत, याचीही माहिती दिली पाहिजे, असेही पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's Swabal slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.