अंबादास दानवेंना दाखवले काळे झेंडे; पिंपरीत सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: October 27, 2023 05:32 PM2023-10-27T17:32:24+5:302023-10-27T17:38:35+5:30
मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ-मोठ्याने घोषणाबाजी केली तर त्यांच्याकडे लक्ष न देताच दानवे हे वायसीएम रुग्णालयात निघून गेले
पिंपरी : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना पिंपरी चिंचवड मध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून काळी झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी तात्काळ त्याना ताब्यात घेतले आहे. अंबादास दानवे येण्यापूर्वीच काही महिला आणि व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर वायसीएम रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना सकल मराठा कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतला आहे. अंबादास दानवे हे वायसीएम रुग्णालयात भेट देण्यात येणार असल्याने आधीच वायसीएम रुग्णालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा होता दरम्यान त्यांना विरोध करण्यासाठी सखल मराठा समाजाच्या महिला आणि तरुणांनी थांबले असता त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते. मग पोलिसांचा मोठा फौजफाटा वाढवण्यात आला. तरीदेखील दानवे यांचा वाहनांचा ताफा येताच नागरिकांच्या घोळक्यात असलेल्या सखल मराठा मोर्चाचा कार्यकर्ता समोर आले आणि काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला यावे काही काळ पोलिसांची धावपळ झाल्याचं बघायला मिळालं त्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ-मोठ्याने घोषणाबाजी केली तर त्यांच्याकडे लक्ष न देताच दानवे हे वायसीएम रुग्णालयात निघून गेले.
अंबादास दानवेंना दाखवले काळे झेंडे; पिंपरीत सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन#pimprichinchwad#MarathaArakshanpic.twitter.com/ucZXLtIPWP
— Lokmat (@lokmat) October 27, 2023