Corona virus : रेमडेसिव्हिर लसीचा काळाबाजार करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 02:09 PM2020-09-24T14:09:02+5:302020-09-24T19:04:27+5:30
आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा, औषध नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पिंपरी : कोरोना (कोविड १९) बधितांवरील उपचारासाठी जीवनदायी ठरत असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एक महिलेसह तिघांना निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहिद जब्बार शेख (वय ३४), विजय बबन रांजणे ( वय ३५), वैष्णवी राजेंद्र टकोरकर (वय ३०, सर्व रा.ओटा स्किम निगडी) यांना जीवनावश्यक औषधांचा काळाबाजार केल्या प्रकरणी अटक केली आहे. मुस्तफा अब्दुल गफार तंबोळी (रा. पाटील नगर, भागरे कॉलनी चिखली) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी शेख यांच्या आईवर २३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर दरम्यान आकुर्डी येईल खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे उपचार सुरू होते. त्यांच्यावरील उपचारासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन आवश्यक होते. बाजारामध्ये हे औषध उपलब्ध होत नव्हते. रुग्णालयात काम करणाऱ्या शेख याने फिर्यादीला १५ हजार पाचशे रुपयात दोन इंजेक्शन उपलब्ध करून दिली. बाजारात या इंजेक्शन ची मूळ किंमत ५,४०० रुपये आहे. तसेच रांजणे आणि टकोरकर यांनी फिर्यादीच्या मित्राच्या वडिलांना औषध विक्रीचा परवाना नसताना एक इंजेक्शन सहा हजार रुपयांना विकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा, औषध नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.