Pimpri Chinchwad | रस्त्यात अडवून स्क्रू ड्रायव्हरने मारहाण; चिखलीत दोघांच्या खुनाचा प्रयत्न
By नारायण बडगुजर | Updated: March 30, 2023 17:55 IST2023-03-30T17:55:00+5:302023-03-30T17:55:07+5:30
चिखलीतील घरकूल येथे बुधवारी (दि. २९) पहाटे सव्वापाचच्या सुमारास हा प्रकार घडला...

Pimpri Chinchwad | रस्त्यात अडवून स्क्रू ड्रायव्हरने मारहाण; चिखलीत दोघांच्या खुनाचा प्रयत्न
पिंपरी : रस्त्यात अडवून एकाला स्क्रू ड्रायव्हरने मारहाण केली. तसेच पत्ता विचारत शिवीगाळ करून धमकी दिली. दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार केले. यात तीन जणांनी दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चिखलीतील घरकूल येथे बुधवारी (दि. २९) पहाटे सव्वापाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
अमित अशोक चव्हाण (वय ३३, रा. घरकूल, चिखली) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. २९) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ओंकार ओव्हाळ आणि त्याच्या दोन मित्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धिरज आढाव हे रस्त्याने जात असताना आरोपींनी त्यांचा रस्ता अडवला. आरोपींनी धिरज आढाव यांना फिर्यादी यांचा पत्ता विचारला. तसेच स्क्रू ड्रायव्हरने मारहाण केली. अमित चव्हाण याचे घर दाखव, नाही तर तुझा मर्डर करेल, अशी धमकी देत आढाव यांना दुचाकीवर बसवून त्यांच्या अपहरणाचा व खुनाचा प्रयत्न केला.
त्यानंतर आढाव यांनी फिर्यादी यांचे घर दाखविले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. यामध्ये झालेल्या झटापटीमध्ये कोयत्याचा वार धिरज आढाव यांच्या डोक्यास लागून दुखापत झाली, असे फिर्यादीमध्ये नमूद आहे.