खडकी शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ जाहीर

By Admin | Published: June 30, 2017 03:49 AM2017-06-30T03:49:52+5:302017-06-30T03:49:52+5:30

खडकी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवड झाली असून, अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्षपदी विलास पंगुडवाले

The Board of Directors of Khadki Shikshan Sanstha | खडकी शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ जाहीर

खडकी शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : खडकी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवड झाली असून, अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्षपदी विलास पंगुडवाले आणि चिटणीसपदी आनंद छाजेड यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
संस्थेच्या संचालक मंडळावर निवडून आलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये शिरीष नाईकरे (सहचिटणीस) व अन्य दहा सदस्यांचा प्रशासकीय मंडळात समावेश आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वर मुरकुटे, डेव्हिड फ्रान्सीस, अनिल मेहता, सूरजभान आगरवाल, राजेंद्र भूतडा, नरेशकुमार गुप्ता, मोहनलाल जैन, प्रमोद गांधी, अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थे, आशिष जैन यांचा समावेश आहे.
खडकी शिक्षण संस्थेची स्थापना १९१३ ची असून या संस्थेत शिशू वर्गापासून ते पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. १९६५ पासून या संस्थेने मुलींची स्वतंत्र शाळा सुरू केली आहे. आगामी काळात मराठी माध्यमासाठी ई-बालवाडी उपक्रम राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर राहील, असे संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.

Web Title: The Board of Directors of Khadki Shikshan Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.