शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर

By admin | Published: May 22, 2017 05:02 AM2017-05-22T05:02:27+5:302017-05-22T05:02:27+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सुमारे दीडशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका सभेने लांबणीवर पाडले आहे.

The Board of Education's budget will not be postponed again | शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर

शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सुमारे दीडशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका सभेने लांबणीवर पाडले आहे. जून महिन्यात शिक्षण मंडळ बरखास्त होणार आहे. त्यामुळे मंडळाचे हे अखेरचे अंदाजपत्रक होते. सत्तांतर झाल्यानंतर भाजपाने आपल्या सदस्यांनाच संधी मिळावी, म्हणून हा अर्थसंकल्प लांबणीवर टाकल्याची चर्चा महापालिका वतुर्ळात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अर्थसंकल्प असतो. यंदा महापालिका निवडणुकीमुळे हे अंदाजपत्रक तयार केले होते. महापालिकेच्या मागील सभेपुढे हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी मांडले होते. आयुक्तांनी सुचविलेल्या कपाती नाकारून स्थायी समितीने शिक्षण मंडळ सदस्यांनी मांडलेले अंदाजपत्रक मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर मांडले होते. महापालिका स्वहिस्सा सुमारे एकशेपाच कोटी रुपये देणार आहे. तर, एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे.
शिक्षण मंडळाने सुमारे दीडशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये आयुक्तांनी सुमारे पंचवीस कोटींची कपात करत १२५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली होती.

Web Title: The Board of Education's budget will not be postponed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.