अध्यक्षपदी सीमा सावळे?
By admin | Published: March 24, 2017 04:16 AM2017-03-24T04:16:08+5:302017-03-24T04:16:08+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समिती सदस्यांची निवड आजच्या सर्वसाधारण सभेत झाली. स्थायी समिती संख्याबळानुसार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समिती सदस्यांची निवड आजच्या सर्वसाधारण सभेत झाली. स्थायी समिती संख्याबळानुसार भाजपच्या १०, राष्ट्रवादी ४, शिवसेना १ आणि अपक्षांच्या एका नगरसेवकाला संधी मिळाली आहे. दहापैकी सहा नगरसेवक जगतापसमर्थक आहेत. पहिल्या टप्प्यात अभ्यासू नगरसेवकाला संधी देण्याचे भाजपाचे धोरण असल्याने सीमा सावळे यांची वर्णी अध्यक्षपदी लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर महापौर आणि सत्तारूढ पक्षनेतेपद भोसरी विधानसभा मतदारसंघाला मिळाले होते. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांमध्ये नाराजी होती. खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यापैकी कोणत्या गटास संधी देणार? कोणत्या विधानसभेला झुकते माप देणार याबाबत चर्चा होती. ‘शहराचा विचार करून सदस्यांना संधी दिली जाईल, असे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सूचित केले होते. त्यानुसार आज १६ सदस्यांची निवड झाली. (प्रतिनिधी)