शुज न घातल्याने मुलाला शाळेतून हाकलले; मुलगा दीड तास बेपत्ता, वडिलांची पोलिसात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 04:49 PM2022-08-08T16:49:47+5:302022-08-08T16:50:03+5:30
मुलाला त्याचे वडील घेण्यासाठी आले असता तो त्यांना सापडला नाही म्हणून त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
पिंपरी : शुज घातले नाही म्हणून १५ वर्षीय मुलाला शाळेतून बाहेर काढले. मुलाला त्याचे वडील घेण्यासाठी आले असता तो त्यांना सापडला नाही म्हणून त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना शनिवारी सकाळी ७ ते दुपारी १२ च्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी काळेवाडीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत फिर्यादी यांचा मुलगा गेला होता. मात्र, त्याने शुज घातले नसल्याने त्याच्या क्लास टिचरने त्याला शाळेतून हाकलून दिले. शाळा सुटल्यानंतर फिर्यादी आपल्याला मुलाला घेण्यासाठी शाळेत गेले. मात्र, त्यांना त्यांचा मुलगा सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र, अवघ्या दीड तासात मुलाचा शोध लागला. क्लास टिचरने वर्गातून हकलून दिल्याने मुलगा आपल्या मित्राच्या घरी जाऊन बसला होता, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.