देहूगाव येथे गणपती विसर्जन करताना बुडालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 05:56 PM2018-09-23T17:56:15+5:302018-09-23T18:42:25+5:30
देहूगाव येथील गाथामंदिराच्या मागे गणपती विसर्जन करताना एका तरुणाचा बुडालेला मुलगा सापडला असून त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देत त्याच्यावर उपचार सुरु आहे.
देहूगाव : देहूगाव येथील गाथामंदिराच्या मागे गणपती विसर्जन करताना बुडालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांना तो सापडल्यावर त्याला तत्काळ कृत्रिम श्वासोच्छवास उपलब्ध करून देत त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. संदिप पंढरीनाथ साळुंके. (वय १९ रा. रूपीनगर,अजिंक्यतारा हौसिंग सोसायटी, तळवडे, मुळ रा.जाळमेवाडी,ता.पाटण,जि.सातारा)असे या मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घटना घडली. पाच वाजण्याच्या सुमारास सुदुंबरे येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळाले. तसेच तो जिंवत हाती लागल्याने जवानांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना उमटली होती.